• Mobile Tricks

  • Software Downloads

  • Mobile Downloads

  • Blogger Templates

  • homepost3

  • homepost6

  • homepost7

दणकट पासवर्ड आणि त्याची मॅनेजमेंट

दणकट पासवर्ड तयार कसा करावा?
इंटरनेट ने जगात मोठी क्रांती केली आहे. आज इंटरनेट खेड्यांपर्यंत पोहोचले आहे. इंटरनेट जगतातील सर्वात मोठी आणि महत्वाची क्रांती म्हणजे ई-मेल. ई-मेल ने तुम्ही तुमचे पत्र क्षणार्धात पठवू किंवा मिळवू शकता ते ही मोफत.

ई-मेल अकाऊंट उघडण्यासाठी तुम्हाला Username आणि Password द्यावा लागतो. पण हकर्समुळे तुमच्या अकाऊंट ला धोका असतो. त्यामुळे तुमचा पासवर्ड दणकट असायला हवा. त्याबद्दल आपण माहीती घेऊ.

युसरनेम सहसा साधं, सोपं आणि तुमची ओळख दाखवणारं असावं. पण पासवर्ड दणकट असायला हवा. तुमची बर्थडेट किंवा प्रेयसीचं नाव(सर्व मुलं बहुतकरून हाच पासवर्ड वापरतात.:-) हे पासवर्ड ठेऊ नका. सहज लक्षात राहील असा पासवर्ड विसरा आणि किचकट पासवर्ड लक्षात ठेवण्याचं काम "पासवर्ड मॅनेजर्स" ना करू द्या. दणकट पासवर्ड मध्ये(Complex Password) स्पेशल कॅरेक्टर, अंक, नाव यांचा समावेश असतो.

हा पासवर्ड तयार करण्यास अडचण येत असल्यास त्यासाठी सोपा पर्याय म्हाणजे www.safepasswd.com.
या साईटवरून तुम्ही दणकट पासवर्ड तयार करू शकता.

दणकट पासवर्ड लक्षात कसा ठेवावा?
साधा सोपा पासवर्ड तुम्ही लक्षात ठेऊ शकता पण किचकट पासवर्ड लक्षात ठेवणं कठीणच. मग हा पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी पासवर्ड मॅनेजर वपरा. खालील पर्याय वापरून तुम्ही पासवर्ड लक्षात ठेऊ शकता.

ऑफलाईन पासवर्ड मॅनेजर:
गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोअरर, मोझिला, इ. ब्राऊजर मधे पासवर्ड स्टोअर करून ठेवता येतो. हा प्रकार ऑफलाईन मध्येच मोडतो. घरच्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉपवर या सेवेचा वापर करण्यास हरकत नाही.

याखेरीज ऑफलाईन पासवर्ड मॅनेजर्समधील सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे कीपास(KeePass). कीपासचे डेक्सटॉप अ‍ॅप्लीकेशन बहुतांश सगळ्याच ऑपरेटींग सिस्टीम मध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, कीपासचे अ‍ॅप्लीकेशन मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम(Android, Blackberry, iPhone, java, palm, etc.) साठी सुद्धा उपलब्ध आहे. तुमचे सर्व पासवर्ड मास्टर पासवर्डद्वारे एका डेटाबेसमधे स्टोअर केले जतात. हा डेटाबेस तुम्ही एक्सेलशीट मध्ये ठेऊ शकता. हा मास्टर पासवर्ड लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
www.keepass.info 


ऑनलाईन पासवर्ड मॅनेजर:
एखाद्या ऑनलाईन सेवेकडे आपले पासवर्ड सुपूर्द करायचे म्हणजे जरा भितीच वाटते. पण या सेवा तुमचे पासवर्ड Encrypt करून स्टोअर करतात. याचा अर्थ त्यांनी ठरवलं तरीदेखील तुमच्या पासवर्डचा गैरवापर त्यांना करता येनार नाही. तुमच्या पासवर्डचा डेटाबेस डिलीट करण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाहीत. 


ऑनलाईन मॅनेजर मध्ये लोकप्रिय नाव म्हणजे पासपॅक(PassPack). ही सेवा सर्वांत सुरक्षीत समजली जाते. तुम्ही कोनत्याही शहरात जा, तुमचा पासवर्ड मॅनेजर तेथेही उपयोगी पडेल. पासपॅकचा वापर करून तुम्ही पासवर्ड शेअर पण करू शकता.
www.passpack.com 

क्लिपर्झ ही देखील तितकीच लोकप्रिय सेवा आहे. यामधील वैशिष्ट म्हणजे तुम्ही तुमचा डेटाबेस पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करून ऑफलाईन देखील वापरू शकता.
www.clipperz.com 


पोर्टेबल पासवर्ड मॅनेजर: 
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पासवर्ड मॅनेजर्स वापरायचे नसेल तर पोर्टेबल पासवर्ड मॅनेजर हा पर्याय उपयोगी पडतो. किपासचेच पोर्टेबल अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहे. ते तुम्ही पेन ड्राईव्ह वर इन्स्टॉल करून वापरू शकता.

Filed Under: , ,

About the Author

My name is Yogesh and i'm part time blogger. Now i'm studying B.sc Comp. sci. Interested in Computer Tricks, Hacking Tricks. TechVishwa.

Leave a Reply